कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात असलेल्या गोशाळेत शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत.
कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचबरोबर अनेक गायींना विषबाधा झाल्याचे समजते आहे. यातील अद्यापही ३० गायींवर उपचार सुरू आहेत. श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
दरम्यान, कणेरीच्या सिद्धगिरी मठावर पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..!