पुणे : संपूर्ण देशभरात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह वीस जणांवर हत्येचा आरोप होता. पुणे सत्र न्यायालयाने आज या आरोपातून धनंजय देसाईसह सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची जमावाने २ जून २०१४ रोजी हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह २१ जणांना येरवड्यातून अटक केली होती. हडपसरमध्ये दोन जून २०१४ला दंगल उसळली होती. यात मोहसीन शेखचा मृत्यू झाला होता. मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेखने फिर्याद दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाईसह इतर २० जणांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाईसह इतर २० जणांना अटक करण्यात आली होती. महापुरुषांबद्दल वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर झाल्यानं धनंजय देसाईनं भाषण केलं होतं.
दरम्यान, त्या भाषणानंतर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीन शेखला मारहाण केली होती त्यात मोहसीन शेख याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील सरकारी वकील उज्वल निकम यांनी माघार घेतली होती. आता पुणे सत्र न्यायालयानं हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह इतर १९ जणांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं आहे.