लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कुशल वाटिका या वसाहतीतील एका सदनिकेला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. ११ ) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
आग नेमके कशाने लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नसली तरी आगीचे लोट पुणे- सोलापूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
सदर घटना ही वसाहतीतील (विंग नंबर – A) सदनिका नंबर २०४ ला लागली आहे.
दरम्यान, घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस नाईक महावीर कुटे, पोलीस हवालदार अजिंक्य जोजारे, ईश्वर भगत, बालाजी बांगर दाखल झाले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात