पिंपरी : दिघी रोडवरील क्लिनिकमध्ये एकाने दमदाटी करताना धुडगूस घालत १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. रामदास शिवराम पवार (वय ५३, रा. मोशी) यांनी याबाबत भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी सोपान निवृत्ती गवळी (३५, रा. भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. रामदास पवार यांचे दिघी रोडवर क्लिनिक आहे. नेहमीप्रमाणे ते रुग्नांची तपासणी करत असताना मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास आरोपी तेथे आला. त्याने क्लिनिकमधील रुग्णांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच डॉ. पवार यांना देखील शिवीगाळ करताना आता १० हजार रुपयांची मागणी केली.
डॉ. पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अजुनच आक्रमक झाला. त्याने क्लिनिकमधील सीझर घेऊन डॉक्टरवर यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेसंदर्भात डॉ. पवार यांनी पोलिसांत तक्रार केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.