Bhor News भोर (पुणे) : वेळवंडी नदीवर येसाजी कंक जलाशयात पोहण्यासाठी आलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बसरापूर (ता. भोर) येथे घडली आहे. मात्र बुडालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे.
रुद्र राहुल शलिंदर (वय १६) (सध्या रा. भोलावडे मूळ रा. साप्रज खडकी, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
रूद्र आणि त्याचा मावसभाऊ पोहण्यासाठी वेळवंडी नदीवर येसाजी कंक जलाशयात आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनास्थळी भोर तहसीलदार सचिन पाटील, सर्कल धर्माकांबळे, पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रय खेंगरे, सहकारी व भोईराज रेस्क्यू जल आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, बसरापूरचे पोलिस पाटील विठ्ठल झांजले, भोलावडे सरपंच प्रवीण जगदाळे, माजी सरपंच सूर्यकांत बदक, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले, पोलिस मित्र केशव साळुंखे व ग्रामस्थ दाखल झाले आहेत.
दरम्यान, बुडालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे.