जीवन सोनवणे
भोर, ता.०८ : शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या वण्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कांबरे खे.बा (ता.भोर) येथे नुकतीच उघडकीस आली आहे.
प्रथमेश देविदास शेलार ( वय-२३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी देविदास केशव शेलार (वय-५५, रा. कांबरे खे.बा.ता.भोर जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दयानंद बबन शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातील पिकांवर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतात येवून पिकांचे नुकसान करतात. त्यामूळे शेतकरी झटका मशीन किंवा विद्युत करंट लावून बंदोबस्त करतात. तर दयानंद शेलार यांनी शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतात तारांचे कंपाऊंड मारले होते. व त्यामध्ये करंट सोडला होता.
दरम्यान, प्रथमेश शेलारला कंपाऊंडमध्ये सोडलेला करंट लागला. आणि त्यात तो मरण पावला आहे. याप्रकरणी देविदास शेलार यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी दयानंद शेलार याच्यावर गुन्हा दखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुतनासे करीत आहेत.