सागर जगदाळे
Bhigvan Trap | भिगवण : शेतकऱ्याचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यातील हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.३) गुन्हा दाखल केला आहे.
रामदास लक्ष्मण जाधव (पोलीस हवालदार, भिगवण पोलीस ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
२५ हजार रुपयांच्या लाचेची केली होती मागणी …
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लोकसेवक आरोपी रामदास जाधव यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी पोलीस हवालदार रामदास जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस हवालदार रामदास जाधव यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Bhigvan News : भिगवण रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम : वन्य प्राण्यांसाठी तयार केले पानवठे ..!
Bhigwan News : हरवलेले तब्बल ६ लाखांचे ३२ मोबाईल भिगवण पोलिसांनी केले परत..!