सागर जगदाळे
Bhigvan News : भिगवण, (पुणे) : भिगवण दफनभूमी संरक्षण भिंतीच्या १० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. या कामासाठी इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तात्रय भरणे माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत मंजूर केलेल्या दफनभूमी संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी कॅांग्रेसचे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत, अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष रियाज शेख, इंदापूर अल्पसंख्यक अध्यक्ष इक्बाल शेख, धनाजीदादा थोरात, आण्णा धवडे, मनोज राक्षे, मोहन शेंडगे, राजेंद्र भिशे, रमेश बाबा धवडे, रोहीत शेलार, सुरेश बिबे, मनोहरबापु हगारे, तैय्यब भाई शेख, शहाजान तांबोळी, रियाज बागवाण, लतीफ तांबोळी, अस्लम मुलाणी, जुबेर शेख, नौशादभाई मुलाणी, ऊमरभाई बागवाण, हाफीज असद आली शेख, मुक्तार भाई मणियार, आदी उपस्थीत होते.