पुणे: सराईत दुचाकी चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पोलिसांनी चार दुचाकी, एक रिक्षा असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अतीश मोहन नातू (वय 23, रा. शनी नगर पुणे), आकाश प्रकाश जाधव (वय 24 रा. कात्रज), शिवराज भीमाशंकर कोळी (वय 23 रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत असताना तपासी पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे यांना खबर मिळाली की, अमत खान व त्याचे वरील तीन साथीदार हे लिपाणे वस्ती येथे असून त्यांनी परिसरात दुचाकी चोरल्या आहेत. यावरून पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या चार दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली. तसेच पोलीस तपासात आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाच गुन्हे असल्याचे देखील उघड झाले आहे.