लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन येथे काल शनिवारी (ता.२०) सकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा बळी गेल्यानंतर, या अपघातास कारणीभूत असलेल्या घटकांच्या विरोधात लोणी काळभोर शहर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
गायत्री व राजश्री या दोन बहिनींच्या मृत्युस लोणी काळभोर वहातुक विभागाचे पोलिस व रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकाऱीच कारणीभुत असल्याचा आरोप करीत, वहातुक विभागाचे पोलिस वरीष्ठ पोलिस अधिकारी व रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकाऱी यांच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी केली आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे याबाबतची लेखी तक्रार उद्या (सोमवारी) तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासमवेत करणार असल्याची माहिती कमलेश काळभोर यांनी दिली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजनेच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात, गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या सख्ख्या शाळकरी बहीनींचा मृत्यु झाला होता.
गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोघींच्या मृत्युस वहातुक पोलिसांचा बेजबाबदारपणा व या लोकप्रतिनीधींचे रस्त्यांकडे असलेले दुर्लक्ष कारणीभुत असल्याबाबतची बातमी पुणे प्राईम न्यूजने केली होती. ही बातमी प्रसिध्द होताच, सोशल मिडीयात खासदार, वहातुक पोलिस यंत्रना व रस्ते-महामार्ग विभाग व विविध राजकीय पक्षांच्यावर मोठ्या प्रमानात टिका होऊ लागली होती.
याबाबत अधिक माहिती देतांना कमलेश काळभोर म्हणाले, कवडीपाट येथील गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या सख्ख्या शाळकरी बहीनींचा अपघातात मृत्यु होणे ही बाब अतिशय दुर्देवी आहे. गायत्री व राजश्री या दोन बहिनींच्या मृत्युस लोणी काळभोर वहातुक विभागाचे पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकाऱीच कारणीभुत आहेत असा आमचा आरोप आहे. पोलिसांनी चौकाचौकात थांबुनवहातुक नियमन करावे असे अपेक्षित असता्ंना, वहातुक पोलिस मात्र वसुलीच्या मागे लागल्याचे दिसुन येत आहे.
फुरसुंगी फाटा, कवडीपाट टोल नाका, लोणी स्टेशन चौक व उरुळी कांचन चौकात पाच ते सहा जणांचे टोळके करुन, वहातुक पोलिस वसुली करत असल्याचे चित्र रोजच दिसुन येत आहे. पोलिसांनी वहातुक नियमन करतांना, वहातुकीचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र पोलिसांना पठाणी वसुली करणे आवडत असल्याने, पोलिस त्यांचे मुख्य काम विसरत चालले कीकाय अशी अवस्था दिसुन येत आहे.
कमलेश काळभोर पुढे म्हणाले, मागिल तीन दिवसात लोणी काळभोर हद्दीत दोन मोठे अपघात झालेले आहेत. यात गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या सख्ख्या शाळकरी बहीनींचा अपघातात मृत्यु झाला तर, आमचे मित्र तुषार साळुंखे यांचा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. या दोन्ही अपघातांना वहातुक पोलिसांचा बेजबाबदार काऱणीभुत आहे. तर दुसरीकडे लोणी काळभोर वहातुक पोलिसांनी चौकाचौकात वहातुक नियंत्रण दिवे बसवण्याबरोबरच, चौकाचौकात रबलर स्ट्रिप लावण्याची परवानगी मिळावी यासाठी रस्ते-महामार्ग विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे.
मात्र, रस्ते-महामार्ग विभाग पोलिसांच्या वरील मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच, मागिल दोन दिवसात झालेल्या दोन्ही अपघातांना वहातुक पोलिस व रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकाऱी कारणीभुत आहेत असा आमचा आरोप आहे. यामुळे लोणी काळभोरवहातुक विभागाचे प्रभारी अधिकारी व रस्ते-महामार्ग विभागाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे.