दिनेश सोनवणे
दौंड : १ रुपयाची सुपारीची पुडी तब्बल ३० लाखाला रुपयाला पडल्याची धक्कादायक घटना दौंडमध्ये घडली आहे. सुपारीची पुडी खरेदी करण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या व्यापाऱ्याच्या गाडीतील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना दौंड शहरातील शिवाजीनगर रस्त्याजवळ रविवारी (ता.२) पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकारणी नंदकिशोर दगडु विधाते (वय-६०, व्यवसाय-नोकरी,रा. पंचशिल थेटर पाठीमागील ता. दौंड जि.पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर विधाते हे दौंड येथील रत्नत्रय ज्वेलर्सच्या दुकानात काम करतात. विधाते हे रत्नत्रय ज्वेलर्सच्या दुकानातील सोने घेऊन रविवारी (ता.२) पाच वाजण्याच्या सुमारास चालले होते. विधाते हे सुपारीची पुडी घेण्यासाठी शिवाजीनगर रोडच्या कोप-यावरील परशुराम अपार्टमेन्ट मधील किराणा दुकानाजवळ थांबले होते. त्यावेळी त्यांनी अॅक्टीव्हा गाडी दुकानाच्या बाहेर लावली होती. सुपारीची पुडी बाहेर घेऊन आले तेव्हा त्यांच्या गाडीतील ३० लाख १८ हजार ५०४ रुपयांची सोन्याचे दागिने असलेली पिषवी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली.
याप्रकारणी नंदकिशोर विधाते यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चवरे करीत आहेत.