बंगळुरू : बंगळुरूच्या केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. या विमानतळावर एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून एका तरुणाची हत्या केली आहे. आरोपीला हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यामधूनच त्याने ही हत्या केली. या घटनेने विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रामकृष्ण असं मृत व्यक्तीचे नाव आहे. हा तरुण विमानतळावर ट्रॉली ऑपरेटर म्हणून काम करत होता. तर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव रमेश असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. सायंकाळी 7 च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर देवनहल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पोलीस सध्या रमेशची चौकशी करत आहेत.
#Karnataka #Bengaluru
An employee of @BLRAirport stabbed to death in parking area of one of the arrival points of terminal 1 at 6pm on Wednesday. Deceased is Ramakrishna and accused is Ramesh. pic.twitter.com/2v9GPHAprV— Express Bengaluru (@IEBengaluru) August 28, 2024
कशी घडली घटना ?
आरोपी रमेशने त्याच्या बॅगेत कुऱ्हाड लपवून आणला होता. रमेश हा विमानतळावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसमध्ये बसला. बसमधून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नसल्याचं त्याला माहिती होत. विमानतळावर पोहचल्यानंतर रमेश हा रामकृष्णची बराच वेळ वाट पाहत होता. रामकृष्ण बाहेर आल्यानंतर रमेशने बॅगेतून कुऱ्हाड काढून रामकृष्णवर वर सपासपवार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
रमेशने ही हत्या का केली?
आरोपीने पोलिसांना सांगितलं की त्याची पत्नी व मृत रामकृष्ण या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्याच रागातून रमेशने रामकृष्णची हत्या केली असावी. पोलीस रमेशची चौकशी करत असून त्यांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बंगळुरू विमानतळावर भितीचे वातावरण पसरलं होतं. विमानतळावर उपस्थित असलेले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ पसरली.