बीड : एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बस लावण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने एका तरुणाचा पाय चिरडला गेला. काल शनिवारी ही घटना घडली. बसस्थानकाची नवी इमारत बांधण्यासाठी जुन्या इमारतीमधील सर्व कार्यालये हटवण्यात आली आहेत. एक तात्पुरते शेड उभारले असले आहे. राधेश्याम आमटे असे या तरुणाचे नाव आहे.
धुळे – सोलापूर बसचे चाक पायावरून गेल्याने राधेश्याम आमटे यांचे पायाचे हाड मोडून मोठी जखम या तरुणाला झाली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. बसस्थानकात पूर्वी मुख्य इमारतीसमोर लांब पल्ल्याच्या व बाहेरून ये – जा करणाऱ्या बस थांबत होत्या. मात्र, बस लावण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने हा आपघात झाला. राधेश्याम आमटे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही बस जुन्या इमारतीसमोर दक्षिण – उत्तर उभ्या राहतात. यामुळे पूर्व – पश्मिच उभारलेल्या बसमुळे दक्षिण – उत्तर उभारलेल्या बसला निघण्याची अडचण होते. हीच अडचण या तरुणाच्या पायावर उठली.