Beed News : बीड : स्पर्धा परिक्षेत अपयश आल्यानंतर एका 40 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीमध्ये आठ वेळा अपयश आल्याने नैराश्यातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील हा तरुण पुण्यात स्पर्धापरिक्षेची तयारी करत होता. या घटनेनंतर कुटंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या
ज्ञानेश्वर अण्णासाहेब आपेट असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरने आपलं महाविद्यालयीन शिक्षण बाविसाव्या वर्षी पूर्ण केले. त्यानंतर तो अधिकारी बनण्यासाठी एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. पुण्यात जाऊन त्याने एमपीएससीची तयारी सुरु केली. मात्र, दोन-तीन वेळा एमपीएससीच्या परीक्षेत अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. मित्रांच्या सल्ल्याने अपयशानंतरही ज्ञानेश्वर आपेट यानं एमपीएससी परीक्षेची पुन्हा तयारी सुरु केली. (Beed News) मात्र आठ वेळा परीक्षेत अपयश आलं. चाळिशी आली आणि आपण इतक्या वर्षांपासून पुण्यात अभ्यास करतोय तरी आपल्याला यश मिळत नाही, याची त्याला खंत वाटत होती. वारंवार आलेल्या अपयशामुळे ज्ञानेश्वर आणखीच नैराश्यात गेला होता.
दरम्यान, तो गावी गेला व त्याने उसाच्या शेतात जाऊन कोणीही नसताना विषारी औषध प्राशन केलं. एक दिवस उलटल्यावर त्याच शेतात काही कामानिमित्त एक शेतकरी आला. तेव्हा ज्ञानेश्वरच्या आत्महत्येचा उलगडा झाला. यानंतर घटनेची तात्काळ माहिती शेतकऱ्याने बर्दापूर पोलीस प्रशासनाला दिली. (Beed News) पोलीस प्रशासनानेही त्या मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याविषयी चौकशी करण्यात आली असता सततच्या अपयश आणि नैराश्यातून ही घटना झाली असावी, असाच प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाने लावला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Beed News : वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली भरधाव रिक्षा; वारकरी जखमी