Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती तालुक्यातील पणदरे येथील ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्य़कर्ते विक्रम भरत कोकरे (वय – २८) यांच्यावर पूर्ववैमनश्यातून ६ जणांनी लोखंडी रोडने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. २१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून जखमी विक्रम यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी १८ संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Baramati News)
मुख्य संशयित आरोपींमध्ये राजेंद्र शिवाजी कोकरे, कुणाल चेतन कुंभार, तुषार हनुमंत कोकरे, धैर्य़शिल संभाजी कोकरे, चेतन विठ्ठल कुंभार, स्वप्निल चेतन कुंभार (सर्व रा. पणदरे) यांचा समावेश आहे. (Baramati News)
तसेच या खूनी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेले संशयितांमध्ये तानाजी तात्यासाहेब कोकरे, अमित शिवाजी कोकरे, कुलभूषण हनुमंत कोकरे, तेजस संजय कोकरे, पुथ्वीराज तानाजी कोकरे, सोमनाथ भारत माने, हर्षल चंद्रकांत जाधव, राजेंद्र लालासाहेब मदने, विशाल दत्तात्रेय कोकरे, योगेश गवळी, भारत कोकरे, गणेश नाना खोमणे (सर्व रा. पणदरे) यांचाही समावेश असल्याचे जखमी विक्रम यांनी फिर्य़ादिमध्ये नमूद केले आहे. (Baramati News)
बारामती येथील खासजी रुग्णालयात कोकरे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्याला स्थिर असून आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी व्यापारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवत वरील घटनेचा निषेध केला. पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचे दिसून आले. (Baramati News)
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसोबावाडी येथील गायरान व गावठाण जमिनीवरील अतिक्रमण खाली करावे म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करीत असल्याने, तसेच खामगळवाडी येथील खडी क्रशर बंद करून शासनाला महसूल मिळवून दिला, याचा राग मनात धरीत वरील लोकांनी कट कारस्थान करीत मला जीवे मारण्याचा प्रय़त्न केला, अशीही लेखी तक्रार विक्रम यांनी फिर्य़ादिमध्ये नमूद केली. (Baramati News)
याशिवाय खिशातील पाणी व्यवसायाचे २५ हजार सहाशे ६० रुपये काढून घेतल्याचाही आरोप संबंधितांविरुद्ध विक्रम यांनी पोलिसात केला आहे. सदरची तक्रार विचारात घेवून पोलिसांनी एकूण १८ संशयित आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, कट कारस्थान करणे, सहमतीशिवाय पैसे काढून घेणे, शिवीगाळ व दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Baramati News)
दरम्यान, तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधिकारी देविदास साळवे यांनी सदर गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेत मुख्य आरोपी चेतन विठ्ठल कुंभार, कुणाल चेतन कुंभार, स्वप्निल चेतन कुंभार यांना तातडीने अटक केली. तसेच संशयित फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. (Baramati News)