Baramati News : (पुणे) : जुन्या भांडणाच्या कारणातून एका अल्पवयीन मुलावर पाच जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामती शहरातील टी. सी. कॉलेज जवळील टी. कॉर्नर नजीक ही घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Baramati News)
पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश धुळाबापू वाघमोडे (रा. जळोची, बारामती), ओंकार सतीश सोनवणे (रा. उर्जा भवनसमोर, एकतानगर, बारामती), श्रीनाथ संतोष शिंदे (रा. रूई, बारामती), गौरव संतोष सुळ (रा. जळोची, बारामती) व पृथ्वीराज (रा. जळोची, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत सूर्यनगरीत राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानेशहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Baramati News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्यार्थी हा मूळचा कर्जत तालुक्यातील राहणारा असून तो सध्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेत आहे. रविवारी (ता. १६) फिर्यादी हा घरी असताना त्याला मित्राचा फोन आला. त्याने टी. सी. कॉलेजजवळ दुचाकी पंक्चर झाली असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी तेथे गेला. पंक्चर काढल्यानंतर ते दुचाकीवरून जात टी कॉर्नरजवळ थांबले. तेथे प्रगतीनगर बाजूकडून दोन दुचाकी आल्या. या दोन दुचाकीवरून पाचजण उचरले.(Baramati News)
त्यापैकी गणेश वाघमोडे व ओंकार सोनवणे यांनी सॅकमध्ये ठेवलेला कोयता काढला. तो फिर्यादीच्या डोक्यात मध्यभागी मारला. फिर्यादी खाली कोसळल्यानंतर पुन्हा दोनदा कोयता मारण्यात आला. तो त्याच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ लागला. रक्ताच्या थारोळ्यात फिर्यादी पडला होता. अन्य तरुणांनी वाघमोडे आणि सोनवणे यांच्याकडे पाहत मोठमोठ्याने ओरडून याला जिवंत सोडू नका, असे सांगितले.(Baramati News)
दरम्यान, फिर्यादीने मित्रासह तेथून कसाबसा पळ काढत एका झाडीचा आसरा घेतला. तेथून पोलीस ठाण्यात फोन केला. त्यानंतर पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.