(Baramati Crime) बारामती : बारामतीमधील (baramati)लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी इंजिनियर अडीच लाख रूपयाच्या लाच (Bribe) प्रकरणी गोत्यात आला आहे. तसेच त्याच्या साथीदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे.
संदीप गोंजारी असे लाच मागितलेल्या लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी इंजिनियरचे नाव आहे. तर, रणजीत प्रकाश सूर्यवंशी (वय.४०, शिक्षक) असे लाच स्वीकारलेल्या त्यांच्या साथीदारचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा मोबदला म्हणून आरोपी संदीप गोंजारी यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती अडीच लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
ती रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपी रणजीत प्रकाश सुर्यवंशी यांना जळोचा रोड येथे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे इंजिनियर संदीप गोंजारी हे गोत्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
बारामतीच्या जावयाने मेव्हणीला नेले पळवून, सासऱ्याची थेट दौंड पोलीस ठाण्यात तक्रार..!
जांबूत शाळेला बारामती कॅटल फिड श्रीरामपूर कडून मोफत मास्क व वह्या भेट