(Baramati Crime) बारामती : आरोपीस गुन्ह्यात मदत करण्यासाठी ९ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला (Baramati Crime ) अटक करण्यात आली आहे.
२७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली तक्रार
प्रदीप दत्तात्रय काळे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात न्यायालयाने तक्रारदारास पोलीस ठाण्यात हजेरी देण्याबाबत आदेश दिले होते. त्या हजेरीची नोंद घेण्यासाठी व गुन्हा तपासात तक्रारदाराच्या बाजुने मदत करण्यासाठी लोकसेवक आरोपी प्रदीप काळे यांनी ९ हजाराची लाच मागितली. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, न्यायालयाने आदेशीत केलेल्या हजेरीची नोंद घेण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासात तक्रारदाराच्या बाजुने मदत करण्यासाठी लोकसेवक आरोपी प्रदीप काळे यांनी ९ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात लोकसेवक काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी काळेला अटक केली आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime News | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती!
Crime News : एनआयएचे पुण्यात छापे ; काय आहे नेमके प्रकरण!