(Baramati Crime) बारामती : महावितरण कर्मचाऱ्यासोबत विजेच्या खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे नातेवाईक आक्रमक झाले असून महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
विजय मुरलीधर गवळी (वय – ५५) असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार….!
महावितरण कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकरी असलेल्या विजय गवळी यांना खांबावर चढता येत असल्याने वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढण्यास सांगितले. मात्र खांबावर चढल्यानंतर तारेतून विजेचा प्रवाह सुरू होता. त्या तारेला शेतकऱ्याचा हात लागला. आणि शेतकरी खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्याला संबधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्हीही कर्मचारी बेपत्ता झाले असून जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.
दरम्यान, माहिती जनसंपर्क अधिकारी विकास पुरी म्हणाले, “झालेली घटना दुर्दैवी आहे. ज्यावेळेस एखादा वीज अपघात होतो त्यावेळेस आम्ही विद्युत निरीक्षकाला माहिती देतो. त्यानंतर त्याचा अहवाल येतो. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!