Baramati Crime बारामती, (पुणे) : वडिलांच्या आजारपणात चुलत भावाला दिलेल्या २३ लाखांच्या बदल्यात ४० लाख रुपये वसूल करणाऱ्या सावकार भावावर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हे.
राजेंद्र नानासाहेब जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यातीचे नाव आहे. याबाबत चुलत भाऊ दीपक बाबूराव जाधव (रा. पाटस रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
दीपक जाधव हे बारामती एमआयडीसीतील कंपनीत अधिकारी आहेत. त्यांना २०१५ साली अँजिओप्लास्टीसाठी पाच लाख रुपये खर्च आला होता. त्यांनी साडेतीन लाख रुपये मित्रांकडून घेतले होते. २०१८ मध्ये ते परत करण्यासाठी चुलत भाऊ राजेंद्रकडे पैशांची मागणी केली. त्यावर त्यांनी पाच टक्के व्याज सांगितले. फिर्यादीने ते घेत मित्रांचे देणे भागवले. पैशापोटी ते राजेंद्र यांना दरमहा १७ हजार ५०० रुपये देत होते.
फिर्यादीने २०२० साली वडिलांच्या आजारपणात राजेंद्रकडून आठ लाख रुपये घेतले. त्याचे कधी २५ हजार, कधी ५० हजार याप्रमाणे ते पैसे देत होते. काही रक्कम ऑनलाईन स्वरुपातही दिली. कंपनी, सोसायटीचे कर्ज देण्यासाठी २०२१ मध्ये राजेंद्रकडून पुन्हा साडेअकरा लाख रुपये घेतले. त्यापोटी दरमहा ६० ते ७० हजार रुपये देत होते. रकमेपोटी राजेंद्र यांनी त्यांच्याकडून चेक सह्या करून घेतले होते.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे व्याज न दिल्याने ते सतत पैशांची मागणी करू लागले. कंपनीच्या गेटवर जाऊन फिर्यादीला बोलू लागले. सगळे मिटविण्यासाठी २५ लाखांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस करीत आहेत.