Baramati Crime | बारामती : कोऱ्हाळे बुद्रक (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीतील एका विहरीत पन्नास वर्षीय एका व्यक्तीचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह विहिरीत टाकला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनील राजाभाऊ वाबळे (वय ५०, रा. मुढाळे, ता. बारामती) असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रक येथील घटना..!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाबळे हे गेली अनेक वर्षे बारामती येथील डॉ. अरविंद खोमणे यांच्याकडे शेतात कामगार म्हणून काम करतात. शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांचा मुलगा गणेश हा जेवणाचा डबा घेवून आला असताना आपल्या वडिलांचा मृतदेह त्याला विहिरीत आढळून आला. हात-पाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याने हा खूनाचाच प्रकार असल्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Baramati Crime : बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराने ९ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी अटक..!
Baramati Crime : बारामतीतील एटीएम चोरी प्रकरणात वापरलेली बोलेरोही चोरीचीच
Baramati Crime : बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर अडीच लाखाच्या लाच प्रकरणी गोत्यात