Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन वर्षांसाठी हद्दपार, तरी लोणी काळभोरमध्ये बिनधास्त वावर; पोलिसांच्या जाळ्यात अडकला अट्टल गुन्हेगार!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 October 2026, 11:54

लोणी काळभोर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार केले असतानाही कोणतीही परवानगी न घेता लोणी काळभोर परिसरात फिरणाऱ्या हद्दपार तरुणाला गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता. 29 सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास लोणी काळभोर टोलनाका, द्राक्षबाग, पुणे-सोलापूर रस्त्यावर करण्यात आली.

आकाश संतोष भाले (वय 23, रा. गारुडी वस्ती, लोणी काळभोर पोलीस ठाण्यामागे) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिसांच्या बातमीदारामार्फत हद्दपार आरोपी आकाश भाले हा लोणी काळभोर टोलनाका परिसरातील द्राक्षबाग येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आकाश भाले संशयितरित्या उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्याने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव आकाश भाले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे हद्दपार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी न्यायालय अथवा पोलीस उपायुक्तांची परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली. मात्र, त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. यानंतर लोणी काळभोर पोलिसांकडून त्याच्या हद्दपारीच्या आदेशाची खातरजमा करण्यात आली. त्यावेळी पोलीस उपायुक्त, परिमंडळ-6 यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 56 (1 )(37) अन्वये आकाश भाले याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे स्पष्ट झाले.

हद्दपार आदेशाचा भंग करून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लोणी काळभोरमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-6चे पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात संतोष कदम, आशिष जाधव, पोलीस हवालदार कर्णवर, देशमुख, महिला पोलीस हवालदार लोखंडे, पोलीस अंमलदार बांदल आदींचा समावेश होता.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37
Next Post

तुमचं SBI अकाउंट, LPG कनेक्शन अन् NPS असेल तर लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून बदलले ‘हे’ नियम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp