हडपसर : हडपसर, भारती विद्यापीठ, कोंढवा, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
आकाश मनोहर गायकवाड (वय- २६, रा. नेहरू पार्क गणपती मंदीरशेजारी, काळेवडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५ लाख २० हजार रुपयांच्या १० मोटारसायकल व फ्लिपकार्ट बॅग मधिल बारकोड असलेला माल जप्त केला आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचा हॉटस्पॉट असलेला भाग अॅमनोरा मॉलच्या पाठीमागे असलेल्या भागातून वेळोवेळी दुचाकी गाड्या चोरीस जात असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तपास पथकाला सुचना दिल्या होत्या. सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एक इसम संशयीत रित्या दुचाकीसह मिळून आला. नमुद इसमाकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास पोलीस ठाण्यात घेवून येवून त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. त्याने हडपसर, कोंढवा, भारती विद्यापीठ, सासवड या भागातुन वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, तसेच फ्लिपकार्ट डिलेव्हरी बॉय पार्सल देण्याकरीता बिल्डींग मध्ये जावून परत आला असता दुचाकीवर लावलेली डिलेव्हीरी बॅग ही मिळून न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही साहित्य सदर आरोपीकडून पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीकडून एकुण ११ गुन्हे उघडकीस झाले असून ५ लाख २० हजार रुपयांच्या १० मोटारसायकल व फ्लिपकार्ट बॅग मधिल बारकोड असलेला माल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.