Pimpari News : पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी, वाकड, सहकारनगरसह शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची दिवसा चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपयांच्या १८ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.(Pimpari News)
एका अट्टल चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रवि परमेश्वर धांडगे (वय २३, रा. पाथर गव्हाण ता. पाथरी जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरी केलेल्या मोटारसायकल या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकल्याचे तपासात निषपन्न झाले आहे.(Pimpari News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दिवसा काही विशिष्ट ठिकाणाहून वारंवार दिवसा मोटार सायकल चोरी होत असल्याचे तपासात दिसून आले होते. मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याचे वरीष्ठांनी आदेश दिले होते. तपास पथकातील पोलिसांनी चोरीच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना असे लक्षात आले की, एकच इसम हा वारंवार चोरी करताना दिसत होता.(Pimpari News)
तपास पथकातील पोलीस शिपाई पालवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सी.सी.टि.व्हि फुटेज मधील इसम हा पाथरगव्हाण येथील असुन तो अधुन मधुन हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात राहण्यास येऊन काही दिवस राहून मोटार सायकल चोरून गावाकडे निघून जात असतो. अशी माहिती मिळाली.(Pimpari News)
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलीस पपथक हे पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरगव्हाण ता. पाथरी जि. परभणी येथे जावुन संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. गुन्हयातील चोरी गेलेल्या मोटार सायकलबाबत तपास केला असता त्याने सदरची मोटार सायकल चोरी करून ती विकास उध्दव धांडगे (रा. पाथरगव्हाण) याला विक्री केली असल्याचे सांगीतले. उद्धव धांडगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता १५ दुचाकी वाहने शेतकरी लोकांना दिल्या असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्या सर्व मोटार सायकल जप्त केल्या आहेत.(Pimpari News)
दरम्यान, पोलिसांनी अटक मुदतीत आरोपी याचेकडे अधिक तपास केला असता त्याने चोरी केलेल्या ३ मोटार सायकल हिंजवडी येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्याहि पोलिसांनी जप्त केल्या आहेत.(Pimpari News)