Junnar Crime नारायणगाव, (पुणे) : नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील आर्वी फाटा (Arvi Phata on Narayangaon-Junnar road) येथे टपरी चालवणाऱ्या (tapri was stabbed) एका महिलेवर चार जणांनी धारदार हत्यारांनी वार ( sharp weapons) करून जखमी केल्याची घटना घडली आहे. हि घटना आज रविवारी (ता. ०७) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
शांताबाई मारुती शिंदे (वय ४८) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. शैलेश बापू लोखंडे, जयेश अशोक शिंदे (रा. सिन्नर), प्रकाश शंकर शिंदे (रा. साकुर), विशाल अण्णासाहेब शिंदे (रा. राहुरी) यांनी हा हल्ला केला असल्याची माहिती हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मुलगा अविनाश शिंदे यांनी दिली आहे. जखमी महिलेवर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,
आर्वी फाट्याजवळ शांताबाई शिंदे यांचे गोळ्या-बिस्किट व इतर साहित्य विक्रीची टपरी आहे. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास चार जणांनी दुचाकीवरून येऊन शांताबाई शिंदे यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली. ती कागदपत्रे त्यांनी देण्याचे नाकारले असता त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केले.
दरम्यान, टपरीतील गल्ल्यातील ३५० रुपये घेऊन हल्लेखोरांनी पोबारा केला. जखमी महिलेची अवस्था पाहून तिला प्रथम ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले. जखमी महिलेवर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला कौटुंबिक वादातून घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :-