पुणे : पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांविरोधात पुणे पोलिसांकडून कडक पाऊले उचलली जात आहेत. शहरातून एकाच वेळी तब्बल ९ गुन्हेगार तडीपार करण्यात आली आहे. हे आदेश परिमंडळ ०२ च्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी दिले आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १) हिन्या ऊर्फ अजिज सलामत शेख (रा. ४२५ / २६ औदयोगीक वसाहत गुलटेकडी, पुणे,) २) शंकर नागप्पा निकले (वय ३२ , रा. स.नं.४२५/२६ औदयोगिक वसाहत झोपडपट्टी, समाज मंदिराजवळ, गुलटेकडी, पुणे) ३) रोशन मिठठु घोरपडे वय १९ वर्षे रा. समाज मंदिराजवळ, औदोगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे.) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४) महेश अनिल साळुंखे (वय २५, रा. रामचंद्रनगर, दत्तमंदिराजवळ, धनकवडी, पुणे) ५) शुभम सिताराम शिंदे (वय २०, रा. स.नं. २/३ सहयाद्रीनगर, प्रभात चौक, धनकवडी, पुणे) आणि भारती विदयापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतीन ६) विशाल बालाजी सोमवंशी (वय २१, रा. स.नं. ३३, रुम नं. ४१६, थोपटे ऑफिस, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खु।।, पुणे) ७) सुजित दत्तात्रय पवार, (वय २० , रा. श्रीनाथ चाळ, जांभळे बिल्डिंग शेजारी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खु।।, पुणे) ८)आकाश रविंद्र उणेचा, वय २० वर्षे, रा. फलॅट नं. २०५, सुयश टेरेस, न्यु डॉन शाळेजवळ, कोंढवा खु।।, पुणे) व ९) सुजित सुरेश सरपाले, वय २६ वर्षे, रा. गंधर्व लॉन्सचे बाजूचा अंजनीनगर रोड, गणपती मंदिराचे मागे, ४ था मजला, नवीन इमारत, अंजनीनगर, कात्रज, पुणे) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस दलाच्या अंतर्गत येत असलेल्या परिमंडळ ०२ मधील स्वारगेट, सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध दारु विकी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल वरील आरोपींच्या विरोधात दाखल आहेत.
दरम्यान, रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन परिमंडळ २च्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन ०९ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डाहळे, यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ०२च्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी केली आहे.