Arrested | पुणे : देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे सोमवारी (ता.१७) सायंकाळी होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना घडली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेप्रकरणी रावेत पोलिसांनी जमीन मालकाला अटक केली आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
नामदेव बारकू म्हसुडगे असे अटक करण्यात आलेल्या जमीन मालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे रस्त्याच्या बाजूला स्वामी हॉटेलजवळ लावलेले एक होर्डिंग साडेपाच वाजताच्या सुमारास कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या सहाय्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या अपघातात होर्डिंग खाली अडकून ५ जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, रावेत पोलिसांनी जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे यास अटक केली आहे. तसेच होर्डिंग तयार करणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी रावेत पोलिसांनी चार पोलिसांची पथके तयार केली आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : पोलीस दलात खळबळ ! निगडीत पोलीस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिलेची आत्महत्या