पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी वापरण्यात येणारे लोखंडी बांधकाम साहित्य चोरणाऱ्याला चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दीपक पांडुरंग इदवे (वय २८, रा. पिंपरी, मोरवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश प्रधान (वय २२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी दिनेश प्रधान हा मेट्रोमध्ये सुरक्षारक्षक आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. रिक्षातून इदवे आणि साथीदार आले. इदवे आणि साथीदारांनी बाणेर परिसरातून २०० किलो वजनाचे लोखंडी पाईप चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी प्रधानने सहकाऱ्यांच्या मदतीने इदवेला पकडले.
दरम्यान, त्याच्या बरोबर असलेली एक महिला आणि काही साथीदार पसार झाले. इदवेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरूअसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.