पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस बोर घाटात आज शुक्रवारी (ता.२५ ) सकाळी साडेनऊच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने सहा वाहनांना उडवल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.
या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोर घाटात किमी ३८ जवळ आज सकाळी ९.30 च्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला.
मुंबई लेनवर भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने समोर जाणाऱ्या प्रवासी वाहनांना धडक दिली. अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.
या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी काही कार चालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.