पुणे : बीडमधील पाटोदा- मांजरसुंबा रस्त्यावर कार आणि टेम्पोच्या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाटोदा तालुक्यातील बामदळे वस्तीवर हा अपघात घडला आहे.
पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाची वाडी (ता. केज) येथे जात असताना पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो व स्विफ्ट कारचा अपघात झाला. यामध्ये सहा जण ठार झाले आहेत.
अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. यामध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे.