पुणे : मरकळ (ता.खेड) येथील नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.१५) उघडकीस आली आहे. या प्रकरणी १४ जणांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप मधुकर वाघमारे (च-होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय ३०), रोनक शैलेश शिंदे (वय १८ रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय १९ भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५रा. भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय ३५ रा. भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय ३८रा. भोसरी), ज्यूईल वोमन युन (वय ३६), ईशा भाऊसाहेब साळवे (वय १९) तीन महिला आरोपी व एक अल्पवयीन मुलगी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय २५ रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मरकळ येथे लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा व धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला आहे.
याप्रकरणी प्रसाद साळुंखे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच येशूचे रक्त म्हणून सरबत पाजून धर्मातराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला हित. आता पुन्हा एकदा आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करत असल्याचा प्रकार मरकळ गावात उघडकीस आला आहे. यांमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.