पुणे : पुणे नाशिक महामार्गावरील १४ नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर एक वर्षापूर्वी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीतील अनंत ग्रामीण पतसंस्थेसह शेजारील दोन दुकानांवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२२) मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामुळे जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मागील वर्षी १४ नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर दरोडेखोरानी दरोडा टाकून केलेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांचा मृत्यू झाल्याची घटना २४ नोव्हेंबर २०२१ घडली होती. तसेच दरोड्यात 2 लाख 50 हजाराची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती.
दरम्यान, पहिल्याच दरोड्याचा अजून तपास लागला नसताना, आत्ता त्याच शाखेवर दुसरा दरोडा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र आताच्या दरोड्यात काय चोरी झाली आहे. ते अद्याप समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.
सविस्तर वृत्त थोड्यावेळातच…