दिनेश सोनवणे
दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता देवीच्या मंदीरात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ९७ हजार किंमतीचा सोन्याचा गंठण चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.३०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी ज्योती मनोहर बोरकर (वय-३५, व्यवसाय शेती रा-कुरळी ता शिरूर जि.पुणे) यांनी सोमवारी (ता.३) दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती बोरकर त्यांचे पती मनोहर बोरकर आणि मुलगा पियुश असे तिघेजण कुरळी तेथुन कुरकुंभ (ता दौड) येथील फिरंगाई माता देवीचे दर्शन करण्यासाठी शुक्रवारी (ता.३०) आले होते. तेव्हा फिरगाई देवीच्या मंदीरात भाविकांची दर्शनासाठी खुप गर्दी होती. बोरकर कुटुंबीयांनी रांगेत उभे राहुन दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देवीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर निघत असताना, दरवाज्यात गर्दीमधुन दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याचा मिनी लंपास केला.
याप्रकरणी ज्योती बोरकर यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास
सहाय्यक पोलीस फौजदार श्रीरंग शिंदे करीत आहेत.