पुणे : Ambegaon News – द्राक्ष विक्री करुन करून पतीसोबत दुचाकीवरून घरी परतणार्या महिलेवर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्लात महिला गजखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना लौकी (ता. आंबेगाव) (Ambegaon News) येथे मंगळवारी (ता. 28) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. (Ambegaon News)
जखमी झालेल्या महिलेचे नाव
जयश्री धोंडीबा भालेकर (रा. मांजरवाडी, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री भालेकर या त्यांचे पती धोंडीबा बाळू भालेकर यांच्यासोबत मंगळवारी कळंबच्या बाजारात द्राक्षे विकून रात्री घरी परतत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लौकी गावच्या वेशीजवळ त्यांची दुचाकी आली असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप मारली. यामध्ये बिबट्याचा पंजा जयश्री यांच्या गुडघ्यावर बसला व दुचाकीवरून खाली पडून त्या जखमी झाल्या.
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नीलेश थोरात यांनी पोपट पोखरकर यांच्या वाहनातून जखमी जयश्री यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या परिसरात बिबट्याचा हल्ला सत्र सुरुत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री नव्हे तर दिवसाही रस्त्यावरुन चालणे जीवावर बेतू शकते. बिबट्या कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही. याची भीती नागरिकांमध्ये बसली आहे. त्यामुळे बिबट्यांनी काही झाले तरी लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडू होत आहे.
पिंपळगाव खडकी येथील लिंबाचा मळा येथे दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात मेंढीचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील लिंबाचा मळा येथे दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात मेंढीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २९) रात्री घडली. पिंपळगाव खडकी येथे लिंबाच्या मळ्यात शेतकरी बाळकृष्ण बांगर यांच्या शेतात मेंढपाळ दारकू बास्कर यांच्या मेंढ्यांचा वाडा बसला होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन बिबट्यांनी या वाड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक मेंढी बिबट्यांनी ठार केली.
दरम्यान, अचानक झालेल्या हल्ल्याने सर्व मेंढ्या सैरावैरा पळत सुटल्या. त्यामुळे मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्या परत येईल, या भीतीने मेंढपाळांनी ठार झालेली मेंढी लांब नेऊन टाकली. बिबट्याने ती लांब ओढून नेत तिचा फडशा पाडला. या घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.