(Ambegaon Crime) आंबेगाव : घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याला घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकऱ्याला अटक…!
बन्सीलाल गेनभाऊ हुले (वय ७३, रा. पिंगळवाडी) असे अटक केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
सहायक निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी, पिंगळवाडी गावाच्या हद्दीतील दावजी बाबा मंदिराजवळ कोंडीभाऊ हुले यांच्या मालकीची चार गुंठे शेती आहे. हुले यांनी ही शेती मक्त्याने करण्यासाठी घेतली आहे. शेतामध्ये अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सहायक निरीक्षक जीवन माने, किरण भालेकर, उपनिरीक्षक महेश पवार, संदीप लांडे, माणिकराव मुळूक, जीवन गवारी, अतीश काळे, एस. व्ही. होले, स्वप्नील कानडे, अरुण काळे, राहुल भवारी यांच्यासह महसूल विभाग, कृषी विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी केली अता अफूची झाडे आढळली. त्यानंतर पोलिसांनी हुले याला अटक करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Oscars Award : आरआरआर RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने रचला इतिहास ; पटकावला ऑस्कर पुरस्कार!
Kaushik Death News : पैशांसाठी सतीश कौशिक यांची हत्या झाल्याचा दावा ; महिलेचे पोलिसांना पत्र!