Ambarnath News : अंबरनाथ : अंबरनाथमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या १२ वर्षांनंतरही मूलबाळ होत नसल्याने तसेच चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची डोक्यात अवजड वस्तू मारून निर्घृण हत्या केली आहे. अंबरनाथच्या पश्चिमेतील आयुध निर्माण संस्थेच्या निवासी वसाहतीत हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (The husband killed his wife because she was not having children)
रोनीतराज मंडल (३७) असे आरोपी पतीचे नाव असून नीतू कुमारी मंडल (३०) खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. (Ambarnath News)
आयुध निर्माण संस्थेच्या वसाहतीतील प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पत्नी व आरोपी पती हे अंबरनाथच्या आयुध निर्माण संस्थेच्या क्रीडांगणासमोर रहावयास होते. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचे २०११ साली लग्न झाले होते. (Ambarnath News) त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्याने नीतू कुमारीवर उपचार सुरू होते. मात्र रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता. रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले. हा वाद सुरू असताना त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचा बनाव रचला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्याने पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली. (Ambarnath News) पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : एसटीच्या अधिकृत थांब्यावर 30 रुपयांत नाश्ता न मिळाल्यास कारवाई
Mumbai News : यापुढे बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार