Jalgaon News जळगाव : जळगाव शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरुणीने सुसाइड नोट लिहली आहे. (Jalgaon News) त्यामध्ये तीने ‘मम्मी- पप्पा, सॉरी. मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख केला आहे. जळगाव शहरातील रौनक कॉलनीतील शुक्रवारी ही घटना घडली आहे. दरम्यान तरुणीने नेमकी आत्महत्या का केली हे अद्याप समोर आली नाही. (Jalgaon News)
एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
कोमल वसंत भावसार (वय ३०) असे आत्महत्याग्रस्त तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुसाइड नोट, लॅपटॉपसह मोबाइल ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल कुटुंबीयांसोबत जळगाव शहरातील रौनक कॉलनी येथे राहत होती. ती एका बँकेत नोकरीला होती. तिचे आई आणि भाऊ पुण्याला आहेत, तर इलेक्ट्रिशियन असलेले वडील शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता कंपनीत कामाला गेले होते. त्यानंतर कोमल ही बँकेत कामावर गेली नाही. ती घरी एकटीच होती.
यादरम्यान तिने घरात गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, वडील कामावरून घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच त्यांना मुलगी कोमल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे सर्व बघून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि कोमलचा मृतदेह खाली उतरवला. पुढील तपास पोलीस करत आहेत.