Air Hostess Sexually Assaulted : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक धक्कादायक प्रकार मागील काही वर्षांमध्ये घडले आहे. कोलकातामधील डॉक्टरसोबत झालेल्या घृणास्पद घटनेनंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. आता लंडनमधील एका हॉटेलमधील एका एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सेंट्रेल लंडनमधील रेडिसन रेड हॉटेलमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाची क्रू मेंबर तिच्या हॉटेलमध्ये झोपली असताना रात्री 1.30 च्या सुमारास एका व्यक्तीने खोलीत घुसून तिच्यावर हल्ला केला. यामुळे ती चांगलीच घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी तिने हल्लेखोरावर कपड्याच्या हॅंगरने हल्ला केला. दरम्यान, संधी साधून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्या व्यक्तीने तिला पकडून पुन्हा खोलीत ओढले. तरुणीने ओरडण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तीच्या सहकारी कर्मचारी मदतीला धावले. हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वेळीच सहकाऱ्यांनी पकडले.
या हल्ल्यानंतर एअर होस्टेलला गंभीर दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर तिला भारतात परत पाठवण्यात आले. त्या तरुणीवर हल्ला करणा-यास पोलीसांनी अटक केली आहे, परंतु त्याची खरी ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान समोर आलेल्या या प्रकरणाला एअर इंडियाने दुजोरा दिला आहे. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेमुळे आम्हाला खूप दु:ख झाले. आम्ही आमचे सहकारी आणि टीम यांच्या संपर्कात आहोत. आम्ही आमचे सहकारी आणि त्याच्या टीमला सर्वतोपरी मदत करत आहोत, ज्यामध्ये व्यावसायिक समुपदेशनाचाही समावेश आहे.
या घटनेप्रकरणी कायदेशीर पाठपुरावा पोलिस करत आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.