Ahmednagar News अहमदनगर : लिंबूसरबतातून विषबाधा होऊन दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची झाल्याची घटना टाकळी काझी (जि. अहमदनगर) Ahmednagar परिसरात नुकतीच घडली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
परिसरात हळहळ व्यक्त…!
शिवराज बापू म्हस्के (वय- ४), तर स्वराज बापू म्हस्के (वय दीड वर्ष) असे मृत्यू झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. सार्थक भाऊसाहेब म्हस्के (वय-१४) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आई-बापावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापू म्हस्के हे गवंडी काम करतात तर आई स्वप्नाली बापू म्हस्के या घर काम करतात. मुलांनी स्वत: लिंबू सरबत बनवलं होत. त्यानंतर त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, एका मुलाचा सकाळी उपचारादरम्यान तर एका मुलाचा सायंकाळी मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही मुलं गेल्यानं आई-बापावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpari crime : आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन म्हणत तरुणाला लुटले, पिंपरीतील प्रकार
Baramati Crime : बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर अडीच लाखाच्या लाच प्रकरणी गोत्यात
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??