पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण आता अहमदनगर महानगरपालिकेत रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अहमदनगर महानगरपालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहमदनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 50 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असला तरी यासाठी 20 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर या पत्त्यावर पाठवावा. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://amc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.