लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन येथे आज (शनिवारी) सकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा बळी व या अपघातास कारणीभुत असलेल्या घटकांच्या बाबतची बातमी “पुणे प्राईम न्यूज” मध्ये प्रसिध्द होताच, सोशल मिडीयातुन खासदार, आमदार, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील वहातुक पोलिस व रस्ते-महामार्ग विभागावर मोठ्या प्रमानात टिका होऊ लागली होती. या टिकेची दखल घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना वाहतुक पोलिस यंत्रना व रस्ते-महामार्ग विभागाला केल्या आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांच्या सुचना व सोशल मिडीयात होत असलेली बदनामी लक्षात घेत, वहातुक पोलिस यंत्रना व रस्ते-महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघातानंतर तासाभरातच अॅक्टीव्ह मोडवर येत अपघात रोखण्यासाठी हव्या असलेल्या उपाय योजना सुरु केल्या आहेत. दरम्यान पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात रोखण्यासाठी योग्य उपाय योजना कऱण्यासंदर्भात शहर पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारी व रस्ते-महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्याशी सोमवार नंतर चर्चा करण्याची असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली.
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात, गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या सख्ख्या शाळकरी बहीनींचा मृत्यु झाला होता. गायत्री शितोळे व राजश्री शितोळे या दोघींच्या मृत्युस वहातुक पोलिसांचा बेजबाबदारपणा व या लोकप्रतिनीधींचे रस्त्यांकडे असलेले दुर्लक्ष कारणीभुत असल्याबाबतची बातमी पुणे प्राईम न्यूजने केली होती. ही बातमी प्रसिध्द होताच, सोशल मिडीयात खासदार, वहातुक पोलिस यंत्रना व रस्ते-महामार्ग विभागावर मोठ्या प्रमानात टिका होऊ लागली होती.
दरम्यान, याबाबत बोलतांना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, अपघातात दोन सख्ख्या बहनींचा मृत्यु होणे ही बाब अंत्यत दुर्देवी आहे. यापुढील काळात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना वहातुक पोलिस यंत्रना व रस्ते-महामार्ग विभागाला केल्या आहेत. तसेच रस्ते-महामार्ग विभागाला पुढील आठवड्यात चौकाचौकात रबलर स्ट्रिप बसविण्याबरोबरच, वहातुक पोलिसांनाही रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पोलिस व नागरीकांनी एकत्र येऊन, मार्ग काढण्याची गरज असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केले.