मुंबई : महाराष्ट्रातील वहिनींचे सर्वात वहिनींचे लाडके ‘भावोजी’ अर्थात ‘होम मिनिस्टर’चे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यावर सिद्धिविनायक मंदीर प्रकरणी अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप मनसेकडून करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व आरोप आदेश बांदकेर यांनी फेटाळून लावले आहे.
आदेश बांदेकर यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तर आता मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी असा आरोप केला की, सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढत असते. परंतु यावर्षी ती निघाली नाही. त्याला आदेश बांदेकर जबाबदार आहे.
दरम्यान, या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
याबाबत बोलताना आदेश बांदेकर म्हणाले कि, गेल्या २ वर्षात कोरोना काळामुळे ही डायरी छापली गेली नाही. अर्थिक खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी डायरी छापण्यात आली नाही. तसेच, मनसेचे हे आरोप राजकीय हेतून आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही.