पुणे : पुण्यातील L3 बार ड्रग्स पार्टी प्रकरण ताजच असताना, आता मॉलमधील ड्रग्स सेवन करतानाचा नवीन व्हिडओ समोर आला. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील प्रकरण चर्चेत होत, त्यांतर आता अमली पदार्थाचे एक एक प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे प्रश्न पडतोय कि, पुण्यात नेमकं काय सुरू आहे. आता, ‘पिट्या भाई’ अर्थात अभिनेता रमेश परदेशीची पोस्ट आता चर्चेत आली आहे
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात फेम रमेश परदेशीने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल करत पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचा आरोप केला होता. तेव्हा ते प्रकरण सुद्धा खूप गाजलं होत. पुण्यात पोर्शे कार प्रकरण आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या अमली पदार्थ सेवनाच्या मुद्यावरून रमेश परदेशीची पोस्ट चर्चेत आली आहे.
रमेश परदेशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, व्यसन, ड्रग्स आधी शहराच्या वेशीवर होते मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आलय. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार तुम्ही? असा प्रश्न पिट्याभाईने पुणेकरांना विचारला आहे.
पिट्याभाईकडून व्हिडीओ पोस्ट
रमेश परदेशीने आता आणखी एक पोस्ट केली आहे. रमेश परदेशीने मॉलच्या बाथरुममध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, आधी ललित पाटील, आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्स पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूम मध्ये ह्या तरुणींचे ड्रग्स सेवन. हेच अशा प्रकारच वास्तव मी काही महिन्यापूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केल.
ते तर सार्वजनिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आणि आता ह्या बाथरूम मध्येही करतायत बिनधास्त आणि त्यांच सार्वजनिक आयुष्य कस धोक्यात आणले. ही तक्रार करून माझे माझ्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य घालावले असे रमेश परदेशीने म्हटले.
आपल्या पोस्टमध्ये रमेश परदेशीने पुढे म्हटले की, आपले आपल्या शहराकडे, आपल्या आणि आजुबाजूला असणार्या मुलांमुलीकडे लक्ष आहे का? आपण लक्ष देणार आहोत का? की फक्त प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? असा सवाल करताना आणि करणार असाल तर डोळे, कान उघडे करून फिरा असे आवाहनही त्याने केले. सगळे जण मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगरान नांगरलेल्या पावित्र पुण्यभूमीला जपू अशी सादही रमेशने आपल्या पोस्टमध्ये घातली आहे.