अजित जगताप
पुसेगाव : ललगुण (ता. खटाव) गावच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थ व पोलीस यंत्रणा सक्षम असतानाही एका सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांची पत्नी व राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी खोट्या तक्रारी करून ग्रामस्थ व पोलीस यंत्रणेला वेठीस धरत आहे. ललगुण गावात दारू व्यवसाय बंद झाला की, इतर ठिकाणी जाऊन व्यसनी लोक दारू पिऊन येतात. काही वेळेला अपघात झाले आहेत. आम्ही कोणत्याही बेकायदेशीर दारू व्यवसायाचे समर्थन करत नाही. किंबहुना गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना सदर महिला कोणतेही सहकार्य करत नाही. राजकीय वजन दाखवण्यासाठी खोट्या तक्रारी केले आहेत. सदर तक्रारीची नोंद करून राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलीस यंत्रणा यांनी संबंधित ठिकाणी जाऊन आठ ते दहा वेळा अचानक धाड टाकलेले आहे.
सुदैवाने यामध्ये कोणताही मुद्देमाल सापडला नाही. तसेच याबाबत कुणालाही अटक झाली नाही.अशी माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. सदरचे निवेदन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. ललगुण गावात मंदिरा समोर, गावठाणात, यडाई माळ, पुसेगाव-फलटण रस्त्यावर ललगुण हद्दीत तसेच आजूबाजूला असलेल्या गावात बेकायदेशीर दारू विक्री होते. परंतु, त्याबाबत तक्रार न करता ठराविक ठिकाणाबाबत एका राजकीय पक्षाच्या महिला पोलिसांनी तक्रार करून वेठीस धरत आहे.
पोलीस कारवाई करताना पुरावा लागतो. तो पुरावाही सापडला नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा ही सदर महिलेच्या लेखी खोट्या तक्रारीला वैतागून गेलेले आहेत राजकीय पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी वाहन व्यवस्था व त्यांच्या चहापाण्याचा खर्च करावा अशी अपेक्षा सदर महिलेने बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्या राजकीय पक्षाच्या बाबत गावामध्ये वेगळीच चर्चा होत आहे. याची गंभीर नोंद त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. असे स्पष्ट केले आहे.
सदर महिलेचे पती हे सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांना कायदा सुव्यवस्थेबाबत चांगली जाण आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. त्या ठिकाणी चालणाऱ्या अनेक बेकायदेशीर व्यवसाया बाबत सदर महिलेला माहिती असूनही ती माहिती ती लपवून ठेवत आहे. असा अनेकांनी त्यावेळी आरोप केला होता. हा आमच्या निवेदनाचा विषय नसला तरी पोलिसांनीच खोट्या तक्रारीची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करू, वरिष्ठांची भेट घेऊ असे सांगून ठराविक लोकांच्या विरोधातच तक्रारी केल्या जात आहेत. याचे गमक काय? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे.
सदर ग्रामपंचायतीने आपल्या गावामध्ये कोणताही दारू व्यवसाय करू नये असा ग्रामसभेत ठराव करावा. अशी आमची मागणी असताना सदर महिलेने पाठिंबा दिला नाही. किंवा असा ठराव करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. याचा अर्थ सदर महिलेला आर्थिक लाभ हवा का? आणि जे कोण देत असतील त्यांची तक्रार करत नाहीत. अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
गावांमधील तरुण मुलं हे उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होत आहेत. अशा मुलांना मार्गदर्शन करण्याऐवजी काही ठराविक ज्येष्ठ नागरिक व बचत गटातील महिलांना खोट्या तक्रारी कराव्यात. म्हणून पुढे घेतले जात आहे. ही बाब आता मोठ्या प्रमाणात खटकू लागलेली आहे. बेकायदेशीर दारू व्यवसाय कोणीही करत नाही. याची स्थानिक पोलीस पाटलांना माहिती आहे. ग्रामपंचायत अशी माहिती आहे. फक्त या महिलेलाच हे दारू व्यवसाय कसे दिसतात? हा संशोधनाचा विषय आहे.
आदरणीय, पोलीस जिल्हा प्रमुख साहेब, याची नोंद घेऊन ललगुण गावांमध्ये भेट देऊन वस्तुस्थिती समजून घ्यावी. अन्यथा खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलेच्या विरोधात पोलीस खात्यातीलच कर्मचाऱ्यांच्या महिला नातेवाईक मोर्चा काढतील. असा या निवेदनाद्वारे इशारा देण्यात येत आहे .सदर निवेदन हे भावनिकरित्या केलेल्या असून यामध्ये स्थानिक ग्रामस्थ व महिला तसेच युवकांचा सहभाग आहे. त्यांची नावे समजल्यानंतर सदरची महिला विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करेल. या भीतीपोटी कोणीही नाव देत नाही. हे कृपया समजून घ्यावे. ही विनंती ही निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, पोलीस यंत्रणेने ललगुण गावातील सर्व बेकायदेशीर दारू धंद्यावर अचानक धाड टाकून सदर महिलेस पंच अथवा साक्षीदार बनवून दोषींना शिक्षा व्हावी. यासाठी प्रयत्न करावा अशी ही अपेक्षा व्यक्त केली आहे