पुणे : कोथरूड येथील करण वर्मा खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.
आशितोष उर्फ सोनु अनिल पालके (रा. गल्ली नं. १२. सोळंखी सुपर मार्केट शेजारी जयभवानी नगर, कोथरूड) निखिल बाळासाहेब गोळे आणि अभय संजय लांडगे असे निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत.
करण वर्मा हे १८ जून २०१६ला कोथरूड येथील प्यासा हॉटेल येथे दारू पिण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी वर्मा यांचा मोबाईल हिसकावून घेतला होता. तेव्हा आरोपी आणि वर्मा यांच्यामध्ये भांडण झाले झाले होते. या भांडणात करण वर्मा यांचा मृत्यू झाला होता. आरोपींनी करण वर्मा याचा मृतदेह किशकिंदा नगरच्या टेकडी वर नेऊन टाकला होता, त्या नंतर अनोळखी आरोपींच्या विरोधात कलम ३०२ नुसार गुहा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपीना कोथरूड पोलिसांनी अटक करून आरोपींचे विरुद्ध न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले होते.
करण वर्मा खून प्रकरणाचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार जिल्हा. व सत्र न्यायालयात तपासले गेले. आरोपीना गुन्हयात गोवण्यासाठी सरकारपक्षाने कुठलाही सबळ पुरावा सादर केला नाही. असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलामार्फत करण्यात आला होता.
दरम्यान, तिन्ही आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याने पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न्यायधीश एस. बी. हेडाऊ यांनी दिले आहेत. आरोपींच्या वतीने, अँड विपुल दुशिंग, अँड. नितीन भालेराव व अँड अजित पवार यांनी काम पाहिले.