सुरेश घाडगे
परंडा : परंडा शहरात १२ वर्षांपूर्वी घडलेल्या मस्जीद विटंबना प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे .परंडा न्यायादंडाधिकारी यांनी दि . ०२/०९/२०२२ रोजी दोन्ही आरोपींची सदर गुन्हयातुन पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे .सदरचे प्रकरण हे सन २०१२ पासुन २०२२ पर्यंत तब्बल १० वर्ष व ४ महिने चालले आहे.
याबाबत माहिती अशी कि, भिमा गोविंद शिंदे व शाम गोविंद शिंदे या प्रकरणातील आरोपींची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ता. परंडा यांनी भारतीय दंड संहिता कलम २९५ व २९५ अ गुन्हयातुन निर्दोष मुक्तता केली आहे .भिमा गोविंद शिंदे व शाम गोविंद शिंदे यांचे विरूध्द परंडा येथे १८ एप्रिल २०१० पासुन २१ एप्रिल २०१० रोजी सकाळी ९.०० ते ५.०० वाजण्याच्या सुमारास संगणमताने मेलेले डुक्कर मस्जीदमध्ये ठेवल्याप्रकणीगुन्हा नोंदविन्यात आला होता.
सदर गुन्हयाचा दोषारोप न्यायादंडाधिकारी यांनी निश्चित केलेले होते. सदर प्रकरणात सबब साक्षी पुरावा होवुन न्यायादंडाधिकारी यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजी दोन्ही आरोपींची सदर गुन्हयातुन पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदरचे प्रकरण हे सन २०१२ पासुन २०२२ पर्यंत तब्बल १० वर्ष व ४ महिने सर्व तपासाअंती गुन्हा निष्पन्न न झाल्यामुळे सुनावणी दरम्यान तपासीक अधिकारी यांच्या मार्फत डी. एन. ए. ची आरोपीची मागणी करण्यात आली.
न्यायालयाने मंजुर करून आरोपी डी. एन. ए. तपासण्यात आले आणि डी. एन. ए. च्या परिणामी डी. एन. ए. चा अहवाल देखिल निगेटीव प्राप्त झाला. करिता साक्षीदाराचा आलेला पुरावा डी. एन. ए. चाचणी अन्वये निर्देश आरोपींना मे. न्याय दंडाधिकारी परंडा यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आरोपी मार्फत विधीज्ञ म्हणुन अॅड. डि. ए. निकाळजे व अॅड. ए. एस. पठाण यांनी काम पाहिले तर सरकार पक्षामार्फत सहाय्यक सरकारी वकील एस. पी. गुंजाळ यांनी काम पाहिले.
फिर्यादी अजिज बशिरोद्दीन मुजावर ( रा. परंडा ) यांनी दि . १९ /०४ /२०१० रोजी पहाटे ४:३० ते ५ वाजणेच्या दरम्यान शहरातील मुजावर गल्लीतील मस्जीदमध्ये कोणीतरी अज्ञात इसमानी मुस्लीम धर्माचा अपमान करणेच्या उद्देशाने मेलेले डुकराचे पिल्लु ठेवुन उपासनास्थानाचे ठिकाण अपवित्र करून मुस्लीम धर्माचे लोकांची धार्मिक भावना दुखविल्या. अशी फिर्याद पोलीस स्टेशन, परंडा येथे दिली होती. यावरून आरोपींविरुध्द भारतीय दंड विधान १८६० चे कलम २९५ व २९५–अ अंतर्गत गुन्हा क. ३४/२०१० ची नोंद झाली होती . या प्रकरणामध्ये तपासाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार करून साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तपासाअंती आरोपींविरूध्द पुरावा उपलब्ध झाल्याने या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. आरोपींविरूध्द अपराध सिध्द करण्यासाठी अभियोगपक्षाने एकूण चार साक्षीदार तपासले. फिर्यादी अजिज बशिरोद्दीन मुजावर, तानाजी राजेंद्र खंबाईत , नंदकिशोर रावसाहेब गायकवाड व पो. नि. अंजुम डी. शेख यांची साक्ष झाली.
साक्षीदाराच्या पुराव्यावरून मशिदीत नेमके डुकराचे पिल्लु मारून कोणी ठेवले हे त्याला सांगता येत नसल्याचे दिसुन येते. तसेच त्याने त्याच्य उलटतपासात ते डुकराचे पिल्लु पाहिले नसल्याचे मान्य केले असुन घटनेच्यावेळी मशिदीच्या दरवाजाला कुलूप असल्याचे देखील त्याने मान्य केले आहे.एकंदरीत अभिलेखावर आलेल्या पुराव्याचे अवलोकन केले असता असे दिसते की, तथाकथित घटना ही कोणीही पाहिलेली नसुन फिर्यादीने त्याच्या पुराव्यात नेमके कोण डुकराचे पिल्लू मारून ठेवले हे त्याला सांगता येत नसल्याचे मान्य केले आहे. तसेच घटनेच्यावेळी सदर मशिदीच्या दरवाजालाही कुलूप असल्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, यावरून आरोपींविरूध्द प्रत्यक्ष व सबळ पुरावा दिसुन येत नाही. त्यामुळे यातील साक्षीदार अंजुम डी .शेख यांचा पुरावा हा तपासाच्या संदर्भाने केवळ औपचारीक स्वरूपाचा दिसुन येतो. याउलट त्यांना केवळ संशयाच्या आधारे सदर प्रकरणात आरोपी करण्यात आले असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे एकंदरीत अभिलेखावर आरोपींविरूध्द कुठल्याच प्रकारचा सबळ पुरावा नसल्याने त्यांना त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपातुन निर्दोष मुक्त करणे आवश्यक आहे. असा युक्तीवाद आरोपीच्या वकीलांनी केला.