पुणे : व्हाट्स अप वर मेसेज करून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या मुसक्या युनिट २ च्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे.
किरण रामदास बिरादार (वय-२४, रा. मांजरी, पो. अवलकोडा ता. उदगीर जि. लातूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सचिन संपतलाल पारेख रा प्लॅट नं ६०२, संजय गार्डन मुकुंद नगर, पुणे यांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पारेख यांना २० डिसेंबर पासून त्यांना अज्ञात फोन वरून व्हाट्स अप वर मेसेज करून पैसे मागून मुलांना व त्यांना जीवे मारण्याची वारंवार धमकी देत होता. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने पुणे कर्पोरेशन येथे खंडणी मध्ये मागितलेली रक्कम घेऊन रविवारी (ता. ०१) गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा व्हाट्स अप ग्रुप तयार करून सापळा लावला होता. त्यावेळी त्यास संशय आल्याने त्याने पळ काढला.
गुरुवारी (ता. ०५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा आरोपीने PMC बिल्डिंग या ठिकाणी सापळा लावला असता त्याने जागा बदलून त्याने गारवारे ब्रिज खाली झुडपात बॅग ठेवण्यासाठी सांगून निघून जाण्यास सांगितले. त्या बॅगवर पाळत ठेऊन १ इसम गारवारे ब्रिज वरून सारखे खाली पाहत असल्याचे निदर्शानास आले. त्याच्यावर संशय आल्याने त्याला युनिट २ च्या अधिकारी व अंमलदार हे त्याचे दिशेने जात असताना त्यास पोलीस आले असल्याचा संशय आल्याने तो त्याचा मोबाईल फेकून पळून जात असताना त्यास पाठलाग करून शिताफिने पकडून ताब्यात घेतले.
दरम्यान, गुण्याच्या अनुशंघाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव व पत्ता किरण बिरादार असे सांगितले त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते तपास करीत आहेत.