मुंबई : एकाच परिसरात रहावयास असलेल्या सहकार्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिस दलातील एका कर्मचार्याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत परब असे निलंबन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकारामुळं वरळी पोलिस वसाहतीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस आणि अभिजीत परब हे एकाच परिसरात रहावयास आहेत. काही दिवसांपुर्वी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक व्हिडीओ आला होता. त्या ग्रुपमध्ये तक्रारदार होते. सदरील व्हिडीओ आपल्याच पत्नीचा असून तो अभिजीत परबने शुट केल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना चांगलाच धक्का बसला. मात्र, सोशल मिडीयावर हा व्हिडीओ नेमका कोणी व्हायरल केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, प्रथमदर्शनी अभिजीत परब यांचा सदरील गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानंतर परब यांना निलंबीत करण्यात आले असून यासंदर्भात त्यांची विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. परब यांच्यावर वरळी पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरळी पोलिस करीत आहेत.