Accident | वर्धा : परभणी येथून आरोपीला घेऊन नागपूरकडे घेऊन जाणाऱ्या पोलीसांच्या वाहनाला ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत महिला पोलिस निरीक्षकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर ३ पोलिस कर्मचार्यांसह आरोपी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २९) सकाळी सात वाजता समृध्दी महामार्गावरील पांढरकवढा गावाजवळ घडली आहे.
पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा आणि चालक शम्मी कुमार यांच्यासह आरोपी वैद्यनाथ शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्यांना सावंगी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याबाबत सावंगी पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे सहकारी एका फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला पोलिस वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. समध्दी महामार्गावरील पांढरकडा गावाच्या परिसरात त्यांचे वाहन ट्रकला पाठीमागुन धडकले आणि भीषण अपघात झाला. त्यामध्ये पोलिस वाहनाचा चक्काचूर झाला. पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला तर बाकीचे सर्वजण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, समृध्दी महामार्गावरील भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, पोलिस अधिकारी संदीप खरात ( आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाम महामार्ग पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या वाहनात एका पिस्टलसह १५ राऊंड आढळून आले असून ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; भरधाव ट्रकची कारला धडक; पुण्यातील महिला ठार