(Accident News) पुणे : मुंबई पुणे महाामार्गावर बुधवारी (ता.15 ) रात्रीच्या सुमारास किलोमीटर 40.00 च्या दरम्यान भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.
अंकुश माने ( सातारा ) असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ( एम.एच 46 बी.बी. 9673 ) टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे शोल्डर लेनवर कडेला उभा होता. त्याला मागून आलेल्या एम.एच. 11 सी.एच. 4172 या वाहनाची पाठीमागून धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की मागच्या वाहनाची केबिन पूर्ण दबली गेली आणि त्यामुळे त्यात अडकून चालकाचा दुर्दैवी मृत्यु झाला. महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या बाजूस किलोमीटर 40.00 च्या दरम्यान झालेली घटना.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना…!
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलि़स पुढील तपास करत आहेत. खोपोली पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन मृत वाहन चालकाच्या कुटुंबाशी संपर्क साधला. चालकाचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगर पालिका रुग्णालयात नेण्यात आला आहे.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्गावरील क्रेन ऑपरेटर्स, महामार्गावरील बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, आपदा मित्र आणि अपघातग्रस्तांचा मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्यानी या अपघातात मदत कार्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!